Thursday, May 23, 2013

जीव घेणारा जुगार

प्रेम, प्रेम तर खुपदा झाले
खूप जणी न वर झाले
हेच माझे खरे प्रेम असे
प्रत्येक वेळी मनाला सांगत गेलो
पण ती माझ्या मनाची फसणूक होती
प्रेमाला वासनेची, आकर्षणाची किनार होती
त्यांचे माझ्यावर खरे प्रेम होते?
असते तर दूर जाताना डोळ्यात ते दिसले का नाही ?
दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकताना
माझी आठवण त्यांना झाली असेन का?
पण मी ही अपेक्षा तरी कशी करू
मला तरी कोठे होत होती कुणाची आठवण ?
आज पुन्हा मला प्रेम झालेय असेच वाटतेय
तिच्या आठवणी मला छळ छळतात
खरच प्रेम म्हणजे एक जुगारच
माणसाचा जीव घेणारा जुगारच


-विजय

No comments:

Post a Comment