Thursday, May 23, 2013

तुझे माझे प्रेम

तुझे माझे प्रेम म्हणजे
चुंबकावरले दोन ध्रुव
असून एकसंध
कधी न एक होणारे

तुझे माझे प्रेम म्हणजे
सामन्यांच्या कल्पनेपलीकडले
त्याला नाही भीती जातीची
नात्यांच्या गुंत्याचा त्रास मात्र फार

तुझे माझे प्रेम म्हणजे
पौर्णिमेच्या चंद्राला लागावे
एकाकी ग्रहण तसे
आपल्या प्रेमाच्या मिलनाला
लागते दुराव्याचे ग्रहण

तुझे माझे प्रेम म्हणजे
पाण्यावर तरंगणारा
तेलाचा थर
असून सोबती
कधी न मिसळणारे एकमेकांत

तुझे माझे प्रेम हे
असेच दोघांचा अंत पाहणारे


-विजय

No comments:

Post a Comment