Thursday, May 23, 2013

मधुचंद्र

रात्रीची नशा मनाला धुंद करी
मनामध्ये प्रीतीचे तारे चमकून जाई
बंद खोलीत मंद प्रकाश
बाहेर रात्राकीड्यांचा तो आवाज

मंद प्रकाशात उजळून जाई उघडी काया
देऊन आव्हान मला तुला तृप्त कराया
अशील तू मिठ्ठीत माझ्या कपड्याविना
नसेन जागा वाऱ्यालाही माझ्याविना

मध्यरात्री बहरून येईल खेळ आपल्या प्रीतीचा
मिलनाच्या त्या नाजूक क्षणी मिटतील डोळे चंद्राचे
होता पहाट होईल जाणीव तुला माझ्या अस्तित्वाची
अशीच काही नशा असेन त्या रात्री मधुचंद्राच्या ...
त्या रात्री मधुचंद्राच्या........


-विजय

No comments:

Post a Comment