Thursday, May 23, 2013

काळोख


रात्रीच्या त्या अबोलपणी
मनाचेच शब्द कानी पडतात
रात्रीच्या त्या काळोखात
डोळे मात्र तूंला शोधतात
लागता चाहूल नाजूक पावलांची
गरकन मागे फिरून पाहत राहतात
गेलीस सोडीन तू मला
तरी वाटते माझ्या वेड्या मनाला
हरवलीस तू ह्या रात्रीच्या काळोखात
भेटशील पुन्हा मला ह्या काळोखात
म्हणून राहतो मी रात्रीच्या काळोखात ..
रात्रीच्या काळोखात....


-विजय


No comments:

Post a Comment