Tuesday, November 12, 2013

मदन आणि यम

कुठेतरी ऐकलेली कथा आहे....
एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.
योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.
काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..
ह्या दोन्ही देवतानी केलेल्या ह्या घोळाची शिक्षा मात्र आपण मनुष्य भोगतो आहोत.......... कसे काय??
हेच बघा ना... जगात किती तरी तरुण अगदी कमी वयामध्ये मदनानी उचललेला चुकीचा बाण लागून मरण पावतात.
आणि या उलट यमाचे चुकीचे बाण लागल्यामुळे कितीतरी म्हातार्‍याना म्हातारचळ लागून ते कामातूर होतात.