Tuesday, March 1, 2016

Lines For Me

so friends here we need description from your side about those to whom you want to write lines. description could be anything name,hobbies,place,any special dialogue etc. once you submit the query you are able to receive lines from us within 3 days.

Saturday, December 19, 2015

ती वेश्या नाही देवाला सोडलेली मुरळी आहे

दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्यादिवाळी आली अन गेली पण आता घरी बसण्यात खूप कंटाळवाणे वाटत होतेएक दिवस संध्याकाळी घरामध्ये काहीच मन लागत नव्हते. थोडासा विरुंगुळा म्हणून गावात गेलो होतो. गावात शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्या शेजारील कट्ट्यावर  गावातील तरुणवर्ग तसेच शाळा महाविद्यालायातील पोर आपआपला घोळका करून इकडच्या तिकडच्या गोष्टीवर चर्चा करत वेळ घालवत असतात. त्या संध्याकाळी मी देखील माझ्या जुन्या मित्रांसोबत त्या कट्ट्यावर जुन्या शाळेतील आठवाणी मध्ये गप्पा मारत रमलो होतो. आमच्या बाजूला नुकतीच महाविद्यालयात जायला लागलेला नवतरुण मुलांचा घोळका त्यांच्या नेहमीच्या गप्पा मारत होता. त्याचा विषय म्हणजे मुली आणि त्यांची लफ़डे. ह्या असा सगळ्या वातावरणात वेळ जात होता हेच माझ्यासाठी महत्वाचे होते.

जुन्या आठवणी म्हटल्यावर त्यात एक ती असतेच जिच्या सौंदर्याची आपल्याला त्या वयात भुरळ पडलेली असते. मी ही त्याक्षणी मनातून तिच्या आठवणीमध्ये रमलो होतो. शाळा संपून अकरा एक वर्ष होत आले पण अजूनही  ती जशीच्या तशी डोळ्यासमोर दिसत होती. तिचे ते घारे निळसर डोळे गालावर पडणारी ती नाजूक खळी सगळे कसे वेड लावणारे होते. मी तिच्या आठवणीमध्ये इतका मग्न झालो कि आजूबाजूची सगळी दुनियाच विसरून गेलो.

मी भानावर आलो ते एका आवाजाने, बाजूला असलेल्या नवतरुण मुलांच्या घोळक्यातील मुलाचा तो आवाज होता. त्याने समोरून जाणाऱ्या एका पोटोशी असलेल्या सुंदर मुलीला उद्देशून बोलल्याचा आवाज होता. तो त्या मुलीला पाहून मोठ्याने बोलला "काय गणपती बसला वाटतो ? आता विसर्जन कधी? ".
मी समोर पाहिले तर काय योगायोग मी आता ज्या मुलीच्या आठवणी मध्ये रमलो होतो ती मुलगी ती हीच होती. दोन मिनिट माझा मलाच विश्वास होत नव्हता. अन वाईट पण खूप वाटत होते. तो मुलगा असा का बोलला असेल? ती पण खाली मान घालून का गेली? का तिने त्या मुलाला रागात पाहिले नाही? का सहन केले ? का ती इतकी असह्य होती?
मी माझ्या मित्राला विचारले, आरे तो मुलगा असा का बोलला ? त्याला नक्की काय बोलायचे होते? माझ्या साठी हे सगळे नवीन होते.
मित्र बोलला, "विज्या गणपती बसला म्हणजे ती आता गरोदर आहे अन विसर्जन म्हणजे ती ते खाली करेल ".
मी : "का ती का खाली करेल "?
मित्र : "तिला नवरा नाही "
मी:  "काय! काय झाल तिच्या नवऱ्याला?"
मित्र : "तिला नवराच नाही".
मी : "मग ही गरोदर कशी ?"
मित्र : "आरे ती कुणाला पण देते पैशावर ".
मी : "काय ? म्हणजे वेश्या आहे काय?"
मित्र : "तू वेडा आहेस का जरा, असले फालतू धंदे आपल्या गावात नाही चालत "
मी : "मग ?"
मित्र: "ती वेश्या नाही देवाला सोडलेली मुरळी  आहे"

हे सगळे ऐकून डोक्यात झिणझिण्या आल्या. इकडे देवळात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून रोज नवीन नवीन आंदोलन ऐकायला मिळतात. ह्याच महाराष्ट्रामध्ये स्त्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्याच महाराष्ट्रामध्ये अजून स्त्रियांवर देवाच्या नावाखाली अत्याचार होत आहेत. कशाला हवा मंदिर प्रवेशकोणता देव न्याय देणार आहेसमाज ह्यांना देवदासी म्हणतो पण माणसाच्या मनातील वासनारूपी राक्षस ह्या देवदासींना  जिवंतपणीच  नरक यातना देत आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे. माणसातील देव ओळखता आला पाहिजे

पसरून पदर देवा
मागते मी मागण
जीण हक्काच रे माझं

केला नवस बापान
होऊ दे पोर म्हणून,
अन सोडली मला
देवाची मुरळी म्हणून

वय होते खेळायचे
खेळ भातुकलीचा,
मांडावा लागला खेळ
हा वाघ्या-मुरळीचा

अशा कसा रे न्याय तुझा
देवदासी म्हणतो  आम्हास,
तरी घालतो हात आमच्या पदरास
हा निष्ठुर माणूस

लग्न-गोंधळात दुसऱ्यांच्या
नाचतो आम्ही मुरळी,
पण आम्ही नाही पाहायचे
स्वप्न आमच्या लग्नाचे

असा कसा रे न्याय तुझा
वेगळा आम्हासाठी,
पसरून पदर देवा
मागते ते मी मागण
जीण हक्काच रे माझं

******************विजय*******************

Tuesday, November 12, 2013

मदन आणि यम

कुठेतरी ऐकलेली कथा आहे....
एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.
योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.
काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..
ह्या दोन्ही देवतानी केलेल्या ह्या घोळाची शिक्षा मात्र आपण मनुष्य भोगतो आहोत.......... कसे काय??
हेच बघा ना... जगात किती तरी तरुण अगदी कमी वयामध्ये मदनानी उचललेला चुकीचा बाण लागून मरण पावतात.
आणि या उलट यमाचे चुकीचे बाण लागल्यामुळे कितीतरी म्हातार्‍याना म्हातारचळ लागून ते कामातूर होतात.

Thursday, August 8, 2013

वळव्याचा पाऊस

नभात ढग दाटून आलेले
पहिल्या पावसाचे
कदाचित ते असावेत
वळव्याच्या पावसाचे
वळव्याचा पाऊस म्हणजे
बरसला तर जोमाने
नाहीत जाईल विरून वाऱ्याने
तुझे प्रेम ही असेच
वळव्याच्या पावसासारखे
बरसला तेव्हा मला चिंब चिबं
भिजवले…
जाताना मात्र माझे आभाळ मोकळे
ठेवूनच गेला…    

Monday, July 1, 2013

मनाची घुसमट

जगात असे कोणतेच अपयश नाही जे माणूस पचवू शकत नाही, पण त्या अपयशाला जग हसेन म्हणून तर माणुस आत्महत्या करतो.
*********

वासना ही ह्या वयात एका विस्तवाप्रमाणे मनात जळत असते त्याला थोडी जरी फुंकर मिळाली तर त्याचा वणवा पेटायला वेळ लागत नाही. त्या वणव्यात त्याच्या आयुष्याची क्षणात राख होऊ शकते.  

*************

शिक्षण हाच एक पर्याय आहे या गरिबीत माखलेल्या संसारातून उभारी घेण्याचा. 

**************

 त्याच्या खूप काही मागण्या नाहीत फक्त अन्न ,निवारा आणि आरोग्य एवढ्याश्या मागण्या आहेत. प्राथमिक गरजांसाठीच त्याची धावपळ सुरु असते. 
 
**************

कुणाचा वेश्या म्हणून स्वीकार करणे सोपे पण कुणाचा बहीण म्हणून सांभाळ करणे फार कठीण.

**************


वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे मतप्रवाह :
बालपण : ह्या जगात आपल्या पालकां शिवाय कोणी शक्तिमान नाहीच.
किशोरवय : ह्या जगात आपल्या पालकांशिवाय कोणीही संकुचित नाही. कधी स्वातंत्र्य देतच नाहीत.
तरुणपण : ह्या जगात आपल्या पालकांशिवाय कोणीही वेडपट नाही. कधी मनासारखे करियर करू देत नाहीत.
म्हातारपण : आपल्याला आपल्या पालकांनी जेवढा वेळ दिला तितका वेळ आपण आपल्या पाल्यांना देऊ शकलो नाही . 



**************

मनात खूप दिवसापासून एक विचार घोळत आहे , गळफास घेऊन माणूस कसा मरत असेन. फासावर लटकलेल्या माणसाला आयुष्याच्या वेदना त्या मरणाच्या वेदनांपेक्षा जास्त असह्य कश्या वाटल्या असतील. कधी कधी वाटते आपण हि असा प्रयत्न करून पहावा पण तो प्रयत्न यशस्वी झाला तर ? ह्या भीतीने हा विचार मागे पडतो.


**************

प्रत्येकाच्या वागण्यामध्ये काही तरी कारण हेतू असतो जो पर्यंत आपण तो हेतू जाणून घेत नाही तो पर्यंत आपण त्याच्या वागण्याबद्दल काही आक्षेप घेऊ शकत नाही. प्रेमाने खूप काही मिळवता येते समोरच्या व्यक्तीच्या मनातील एक एक कप्पे फक्त प्रेमानेच खुले होतात. 


**************
 
लग्न म्हणजे फक्त व्यवहार किंवा सोहळा नाही. लग्न म्हणजे कुणी कुणाचा कब्जा मिळवणे नसते तर एकमेकांच्या स्वाधीन होणे असते


**************

मी नास्तिक आहे पण फक्त माझ्या चांगल्या काळात. वाईट काळात माझे देखील पाय नकळत मंदिराच्या पायऱ्या चढतात आणि त्या दगडाच्या मूर्ती समोर हात जोडले जातात.


**************

वाट चुकलेले वासरू एक तर आपल्या प्रवासामध्ये एखाद्या अनोळखी ठिकाणी जाऊन हरवते किंवा वाट शोधण्यातच आपले आयुष्य संपवून टाकते. मला देखील थोडे असेच वाटतेय.


**************

मी अगदी निर्लज्ज आहे, कारण लाज बाळगावी असे कामच मी मुळात करत नाही.


**************

माणूस मृत्यू पेक्षाही कशाला जास्त भीत असेन तर तो समाजाला , म्हणून तर कधी कधी तो समाज काय बोलेल ह्या भीतीने मृत्यूला जवळ करतो.


**************

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते पण मला तर वाटते आपण सर्व जण शेवटपर्यंत मातीचे गोळेच असतो फरक एवढाच लहानपणी आकार देणारे हात दुसऱ्यांचे असतात नंतर मात्र आपणच आपल्याला आणि आपल्या विचारांना आकार द्याचा असतो.


**************

प्रेमात पडणं काही गुन्हा नव्हे ..पण प्रेमासाठी गुन्हा?
प्रेम म्हणजे उदात्त भावना वगैरे ठीक आहे.
पण काही प्रेमविव्हळ मजनू मात्र लैलाच्या चैनीखातर नाहक स्वत:वर गुन्हेगारीचा स्टॅम्प मारून घेतात. अगदी आनंदाने.
निवांत गप्पा मारायला महागड्या कॉफीशॉपमध्ये जा. तिथे पदरमोड ठरलेलीच.
उंची भेटवस्तू देणं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग, असाही काहींचा गैरसमज.
प्रेमात पडणं गुन्हा नाही; पण प्रेमासाठी गुन्हा करणं मात्र बिल्कुल गलत.
 
 
 
 
 
 
 


**************
 
प्रेम प्रेम म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घ्याची गरज आली आहे असेच वाटतेय. आज कोणी जर बोलले हि माझी प्रियसी आहे तर लगेच मित्रांचे वाक्य असते काय लेका काही केले आहे कि नाही आरे कमीत कमी कीस तरी घ्यायचं यार. प्रेम हे इतकेच आहे का? शरीराची ओढ ही एक प्रेमातील छोटीशी गोष्ट आहे पण आजकाल केले प्रेम केले जाते ते फक्त शरीराच्या ओढीनेच. आणि ती प्रत्येक वेळी ती बदलत असते.भावनिक प्रेम हे शिल्लक आहे का कोठे आता? वासना ही अमर्याद आहे. 


**************

Sunday, June 23, 2013

एकटे फूल


बागेच्या त्या कोपऱ्यात
रोपट्यावर उमलेले एकटे फूल
सुगंधाने, सौंदर्याने आपल्या
किती तरी भुंग्यांना वेड लावते
एकटेपणात जपत होते सौंदर्या आपले

एकटेपणा घालवण्यासाठी ती सुद्धा
भुलली असेन काही सुंदर भुंग्यांना
भुलाण्यामध्ये ती विसरून गेली असेन
भुंग्यांची साथ मात्र काही क्षणाची
असेन जोवर सुगंध तोवरच
घालतील घिरट्या भोवती
जाता सोडून सुंगंध जातील दुसऱ्या फुलांकडे

हवा होता तिला एक सोबती अशा
गळणाऱ्या आपल्या पाकळ्या
त्याच्या उराशी धरणारा
निर्माल्य झालेले फूल जपून ठेवणारा
सुगंध, सौंदर्याशिवाय मला आपलेसे करणारा
कदाचित माझ्यात तिला तो दिसला असावा
कदाचित माझ्यात तिला तो दिसला असावा